Wednesday, April 18, 2012

याला म्हणायचे तरी काय ?

           सध्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनमधील सुरक्षिततेबाबत एक गोष्ट निदर्शनास आली ती अशी कि, संध्याकाळी जेव्हा कार्यालय सुटते त्यावेळी काही गोपनीय माहिती कर्मचा-यामार्फत बाहेर जाऊ नये यासाठी कडक तपासणी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाकडून केली जाते. हे सर्व  योग्य आहे परंतु त्यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे सदर तपासणी फक्त हंगामी कर्म-यांचीच केली जाते आणि तेहि फक्त कार्यालयीन वेळ संपताना. कायम स्वरूपी  कर्मचारी यातून वगळले जातातच त्याबरोबरच प्रोफेसर, विवध कामासाठी आलेले विद्यार्थी यांची मात्र बाहेर जाताना तपासणी केली जात नाही. या अश्या परिस्थितीमुले हंगामी कर्मचा-यांमध्ये एक अपराधी पनाची भावना निर्माण झाली आहे आणि ज्या कुणी हा उपक्रम राबवला आहे त्यांच्यामते फक्त हंगामी कर्मचारीच अश्या प्रकारचे गुन्हे करू शकतात असे गृहीतच धरले गेले आहे जवळ जवळ. 
         
           एखादा कर्मचारी मग तो कुणीही असो जर त्याला असे करायचेच असेल तर तो एखादा  विद्यार्थी जो काही कामाचे निमित्त करून परीक्षा विभागात येईल आणि त्याच्यामार्फत एखादी गोपनीय माहिती सहज बाहेर काडू शकणार नाही का ? प्रोफेसर आणि कायम कर्माचा-याबाबतही हि शंका कायम राहतेच.
        
           विद्यानगरी परिसरातील विद्यापीठाच्या विविध विभागामधून जे कर्मचारी ज्यात हंगामी आणि कायम कर्मचारीही मोडतात तसेच विविध विद्यालयातील कर्मचारीही सर्रास परीक्षा भवनामध्ये ये-जा करत असतात त्यांच्या बद्दल काय ? 

              परीक्षा भवनातील  जे कर्मचारी परीक्षा विभागात दिवसभर आत - बाहेर करत असतात त्यांच्या बदल काय ? 

            जे कर्मचारी असा प्रकार करताना सापडले आहेत त्यांना विद्यापीठाच्या सेवेत पुन्हा कसे काय सामाऊन घेतले जाते या बाबतीत कुणीच कसे लक्ष घालत नाही ? त्याबाबत प्रशासनाकडून  कडक नियम का अमलात आणले जात नाहीत ? 

           जाणकारांनी याबाबत योग्य पर्याय शोधावा आणि हंगामी कर्मचारीच अश्या प्रकारचे गुन्हे करतात हा गैरसमज दूर करावा असे वाटते.

Saturday, September 11, 2010

एक गोश्ट

                  दोघे नवरा बायको असतात. नवरा बिचारा गरीब असतो. परंतु त्याच्या त्या साधेपनाचा भरपूर फ़ायदा त्याची बायको घेत असते. त्याला खायला प्यायला वेळेवर देत नसे. चार चॊघात ससत त्याचा अपमान करत असे. एकंदरीत त्याच्याकडे दुर्लक्श करुन स्वत: मात्र त्यानेच कमाऊन आणलेल्या कमाईवर मजा मारत असे. नवरा तिला बरेच वेळा समजाउन सांगत असे, परंतु तिच्यावर त्याचा काहीही परीणाम होत नसे. त्यामुळे तो अगदी मेटाकुटीला आला होता.  शेजारी पाजारीही त्यामुळे त्यांना नावे ठेवित असत. गावात सर्वजन आनंदात नांदत होते पण यांच्यात मात्र सगळाच आंनंद होता.

                 अश्या सतत होणा-या अपमान आणि बदनामीला कंटाळून अखेर त्याचा स्वाभिमान जागा झाला. आणि त्याने या बायकोला सोडून दुसरी सर्व गुणसंप्पन्न नवरी शोधण्यास सुरवात केली. बरीच शोधाशोध केल्यावर त्याला एक सर्व गुणसंप्पन्न नवरी मिळाली. त्याने पहिल्या बायकोला सोडून दिले आणि सर्व गुणसंप्पन्न नवरी बरोबर लग्न केले.

                 दुसरी बायको खरेच सर्व गुणसंप्पन्न होती. ती त्याची मनोभावे सर्व सेवा करायची. त्याला वेळेवर खायला प्यायला द्यायची. सर्वत्र त्याचा मान राखायची. त्यालाही आपल्या दुस-या बायकोचा अभिमान वाटायला लागला. तोही तिला  काय हवं नको ते पहायचा.

                 याच्या नव्या बायकोने कुठलीही एखादी गोश्ट  केली कि, हा सर्वांना सांगत सुटायचा माझी पहिली बायको अशी करत नव्हती. २ री ने याला वेळेवर जेवण दिले कि हा म्हणायचा, १ ली मला वेळेवर जेवणच द्यायची नाही. २ री याच्यविशयी काही चांगले बोलली कि हा म्हणायचा, १ ली मला कधीच चांगले बोलायची नाही. २ री ने याचे डोके, पाय चेपले तर हा म्हणायचा, १ ली कधीच माझे डोके, पाय चेपत नसे.

                 म्हणजे २ री ने काहिही केले की  हा म्हणायचा, पहिली असचं करायची नाही, तसचं करायची नाही. २ री ने काहीही केले कि याचे लगेच १ ली बद्दल रामायण सुरु.

                 एके दिवशी याचे २ री बरोबर कडाक्याचे भांडण झाले.  २ री याच्यावर खूप रागावली होती.  ती रागाने त्याला म्हणाली, मी तुमच्यासाठी एवढे करूनही तुम्हाला माझे काही कॊतुकच नाही. तुमचे खरे प्रेम तुमच्या १ ल्या बायकोवरच आहे. मी तुमची मनोभावे सेवा करुनही तुम्ही तुमच्या १ ल्या बायकोला विसरू शकला नाही आणि तिच्याबद्दलच  सर्वांना सांगत सुटला आहात. माझ्याबद्दल मात्र कुणालाच काही सांगत नाही. माझी तुम्हाला काही गरजच नाही असे म्हणून ती त्याला सोडून  निघून गेली. 

                त्याने तिची नंतर खुप मनधरणी केली पण त्याचा काहीही फ़ायदा झाला नाही.


                २ -या बायकोचे गुणगान गाण्याचे सोडून तो पहिल्याच बायकोचे अवगुण सर्वांना सांगत सुटला. त्याचा परीणाम असा झाला कि,  त्याची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली. 

                 जवळ जवळ अशीच अवस्था हिंदू धर्माचा त्याग करून बॊद्ध धम्माचा स्विकार करणा-या आपल्या सर्वांची झाली आहे.

                  ज्याचा स्विकार केला ते कसे चांगले आहे हे सांगण्यापेक्शा, त्याचा प्रसार करण्यापेक्शा, ज्याचा त्याग केला आहे ते कसे वाईट आहे हेच सांगत सुटलो आहोत.



                 मग आपली अवस्था नेमकी कशी आहे आणि कशी असावी याचाही विचार करायला हवा.



जय भिम......................... धन्यवाद .................

Saturday, September 4, 2010

सुखी आणि समृद्ध भारतासाठी

माझ्या मते सर्व मानव एक आहेत.


काही मानवानी  आपल्या फायद्यासाठी   धर्म, जाती, पंथ निर्माण केले.


आम्ही सर्व जर हिन्दू आहोत तर मग आमच्यात ही विविध जातींची बंधने का ?


सर्व हिन्दू एक आहेत असे का मानले जात नाही ?


            अजुनही लग्न करताना जर आम्ही सर्व हिन्दू  म्हणून एक आहोत तर मग एक हिन्दू दूस-या हिन्दुशी विवाह का करू शकत नाही ?
            तेव्हा मात्र हिंदुत्व नाकारून जातींचा विचार केला जातो. तेव्हा हिन्दू धर्मातील मानवता आणि समानता कुठे जाते ?


आत्ता  राहिला समानतेचा  आणि राखीव जागांचा प्रश्न.


                     जर प्रामाणिकपने हा प्रश्न सुटावा असे आपल्या प्रत्येकाला वाटत असेल तर एक उत्तम मार्ग आहे पण त्यासाठी सर्वांनी आपला जातिभिमान आणि संपत्तीचा मोह सोडून तो अवलंबवला पाहिजे.


१. आपल्या देशातील सर्व शाला, कॉलेज, विद्यापीठे यांचे केन्द्रीकरण करने आवश्यक आहे. ज्याला हवे त्या भाषेत हवे ते शिक्षण अगदी उच्चशिक्षण सुद्धा मोफत देने आवश्यक आहे. परन्तु सर्व भारत भर एकच अभ्यासक्रम असावा.


२. आपल्या देशातील सर्व शेतीचे केन्द्रीकरण करून त्याद्वारे मिलनारे उत्पन्न सर्व जनतेला समान वाटले गेले पाहिजे. शेतामध्ये काम करना-या कामगाराला वेतन शाशानाने  दिले पाहिजे.


३. ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाने सर्वाना काम देने ही शाशनाची जबाबदारी असेल, आणि  काम कुठल्याही प्रकारचे असले तरीही सर्वाना समान वेतन हे धोरण अवलम्बिवले पाहिजे. ज्याद्वारे त्या कुटुंबाचा उदरर्निर्वाह योग्य प्रकारे होइल.


४. देशभरातील सर्व उद्योग धंदयाचे केद्रिकरण करने आवश्यक आहे. जेणेकरून सर्वाना नोकरी देण्याची जबाबदारी शाशनास  योग्य प्रकारे पार पाडता येइल.


५. प्रत्येक मानवाला त्याची ओळख पठविन्यासाठी फोटो आणि फक्त नाव याचीच गरज असावी. नोकरीसाठी करण्यात येना-या अर्जात आडनाव, धर्म, ज़ात, वर्ण  यांची अजिबात नोंद न करता फक्त शिक्षणाची नोंद असावी आणि ती व्यक्ति फ़क्त भारतीय असावी.


६.भारतातील सर्व देवले, मस्जिदी, विहारे इ. सर्व धार्मिक संस्थांचे केन्द्रीकरण करून त्याद्वारे मिलनारे उत्पन्न देशाच्या उन्नत्तिसाठी वापरने योग्य होइल.


                  जर आपण सर्वानी मिळून या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी एक सक्षम असा दबाव गट निर्माण केला तर ही गोष्ट नक्की साध्य होइल. जर असे झाले तर आपल्या भारत देशात   उच्च - नीच, गरीब - श्रीमंत असा भेद निर्माण होणार नाही. त्यामुले सम्पूर्ण देशात समानता नांदेल आणि मग राखीव जागा, सवलती याची कोणाला काहीही गरज भासणार  नाही. सर्व भारतीय सुखी, समृद्धि जीवन जगतील.


एक सक्षम भारत बनविण्यासाठी काय आपन एक होऊ शकतो ?


जे लोक हे वाचतील अणि ज्याना हे पटेल त्या सर्वांनी हे वाचण्यासाठी सर्वाना सांगावे.


धन्यवाद.