याला म्हणायचे तरी काय ?
सध्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवनमधील सुरक्षिततेबाबत एक गोष्ट निदर्शनास आली ती अशी कि, संध्याकाळी जेव्हा कार्यालय सुटते त्यावेळी काही गोपनीय माहिती कर्मचा-यामार्फत बाहेर जाऊ नये यासाठी कडक तपासणी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाकडून केली जाते. हे सर्व योग्य आहे परंतु त्यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे सदर तपासणी फक्त हंगामी कर्म-यांचीच केली जाते आणि तेहि फक्त कार्यालयीन वेळ संपताना. कायम स्वरूपी कर्मचारी यातून वगळले जातातच त्याबरोबरच प्रोफेसर, विवध कामासाठी आलेले विद्यार्थी यांची मात्र बाहेर जाताना तपासणी केली जात नाही. या अश्या परिस्थितीमुले हंगामी कर्मचा-यांमध्ये एक अपराधी पनाची भावना निर्माण झाली आहे आणि ज्या कुणी हा उपक्रम राबवला आहे त्यांच्यामते फक्त हंगामी कर्मचारीच अश्या प्रकारचे गुन्हे करू शकतात असे गृहीतच धरले गेले आहे जवळ जवळ.
एखादा कर्मचारी मग तो कुणीही असो जर त्याला असे करायचेच असेल तर तो एखादा विद्यार्थी जो काही कामाचे निमित्त करून परीक्षा विभागात येईल आणि त्याच्यामार्फत एखादी गोपनीय माहिती सहज बाहेर काडू शकणार नाही का ? प्रोफेसर आणि कायम कर्माचा-याबाबतही हि शंका कायम राहतेच.
विद्यानगरी परिसरातील विद्यापीठाच्या विविध विभागामधून जे कर्मचारी ज्यात हंगामी आणि कायम कर्मचारीही मोडतात तसेच विविध विद्यालयातील कर्मचारीही सर्रास परीक्षा भवनामध्ये ये-जा करत असतात त्यांच्या बद्दल काय ?
परीक्षा भवनातील जे कर्मचारी परीक्षा विभागात दिवसभर आत - बाहेर करत असतात त्यांच्या बदल काय ?
जे कर्मचारी असा प्रकार करताना सापडले आहेत त्यांना विद्यापीठाच्या सेवेत पुन्हा कसे काय सामाऊन घेतले जाते या बाबतीत कुणीच कसे लक्ष घालत नाही ? त्याबाबत प्रशासनाकडून कडक नियम का अमलात आणले जात नाहीत ?
जाणकारांनी याबाबत योग्य पर्याय शोधावा आणि हंगामी कर्मचारीच अश्या प्रकारचे गुन्हे करतात हा गैरसमज दूर करावा असे वाटते.
No comments:
Post a Comment