दोघे नवरा बायको असतात. नवरा बिचारा गरीब असतो. परंतु त्याच्या त्या साधेपनाचा भरपूर फ़ायदा त्याची बायको घेत असते. त्याला खायला प्यायला वेळेवर देत नसे. चार चॊघात ससत त्याचा अपमान करत असे. एकंदरीत त्याच्याकडे दुर्लक्श करुन स्वत: मात्र त्यानेच कमाऊन आणलेल्या कमाईवर मजा मारत असे. नवरा तिला बरेच वेळा समजाउन सांगत असे, परंतु तिच्यावर त्याचा काहीही परीणाम होत नसे. त्यामुळे तो अगदी मेटाकुटीला आला होता. शेजारी पाजारीही त्यामुळे त्यांना नावे ठेवित असत. गावात सर्वजन आनंदात नांदत होते पण यांच्यात मात्र सगळाच आंनंद होता.
अश्या सतत होणा-या अपमान आणि बदनामीला कंटाळून अखेर त्याचा स्वाभिमान जागा झाला. आणि त्याने या बायकोला सोडून दुसरी सर्व गुणसंप्पन्न नवरी शोधण्यास सुरवात केली. बरीच शोधाशोध केल्यावर त्याला एक सर्व गुणसंप्पन्न नवरी मिळाली. त्याने पहिल्या बायकोला सोडून दिले आणि सर्व गुणसंप्पन्न नवरी बरोबर लग्न केले.
दुसरी बायको खरेच सर्व गुणसंप्पन्न होती. ती त्याची मनोभावे सर्व सेवा करायची. त्याला वेळेवर खायला प्यायला द्यायची. सर्वत्र त्याचा मान राखायची. त्यालाही आपल्या दुस-या बायकोचा अभिमान वाटायला लागला. तोही तिला काय हवं नको ते पहायचा.
याच्या नव्या बायकोने कुठलीही एखादी गोश्ट केली कि, हा सर्वांना सांगत सुटायचा माझी पहिली बायको अशी करत नव्हती. २ री ने याला वेळेवर जेवण दिले कि हा म्हणायचा, १ ली मला वेळेवर जेवणच द्यायची नाही. २ री याच्यविशयी काही चांगले बोलली कि हा म्हणायचा, १ ली मला कधीच चांगले बोलायची नाही. २ री ने याचे डोके, पाय चेपले तर हा म्हणायचा, १ ली कधीच माझे डोके, पाय चेपत नसे.
म्हणजे २ री ने काहिही केले की हा म्हणायचा, पहिली असचं करायची नाही, तसचं करायची नाही. २ री ने काहीही केले कि याचे लगेच १ ली बद्दल रामायण सुरु.
एके दिवशी याचे २ री बरोबर कडाक्याचे भांडण झाले. २ री याच्यावर खूप रागावली होती. ती रागाने त्याला म्हणाली, मी तुमच्यासाठी एवढे करूनही तुम्हाला माझे काही कॊतुकच नाही. तुमचे खरे प्रेम तुमच्या १ ल्या बायकोवरच आहे. मी तुमची मनोभावे सेवा करुनही तुम्ही तुमच्या १ ल्या बायकोला विसरू शकला नाही आणि तिच्याबद्दलच सर्वांना सांगत सुटला आहात. माझ्याबद्दल मात्र कुणालाच काही सांगत नाही. माझी तुम्हाला काही गरजच नाही असे म्हणून ती त्याला सोडून निघून गेली.
त्याने तिची नंतर खुप मनधरणी केली पण त्याचा काहीही फ़ायदा झाला नाही.
२ -या बायकोचे गुणगान गाण्याचे सोडून तो पहिल्याच बायकोचे अवगुण सर्वांना सांगत सुटला. त्याचा परीणाम असा झाला कि, त्याची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली.
जवळ जवळ अशीच अवस्था हिंदू धर्माचा त्याग करून बॊद्ध धम्माचा स्विकार करणा-या आपल्या सर्वांची झाली आहे.
ज्याचा स्विकार केला ते कसे चांगले आहे हे सांगण्यापेक्शा, त्याचा प्रसार करण्यापेक्शा, ज्याचा त्याग केला आहे ते कसे वाईट आहे हेच सांगत सुटलो आहोत.
मग आपली अवस्था नेमकी कशी आहे आणि कशी असावी याचाही विचार करायला हवा.
जय भिम......................... धन्यवाद .................
कहाणी खुप आवडली.
ReplyDeleteथेट मुद्यात हात घालणारी व सोप्या पद्दतिने विषय समजावणारी कहाणी.
धन्यवाद.